Type to search

Featured जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

कोरोना : घरबसल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन चित्रकला प्रशिक्षण

Share

चाळीसगावात वसुंधरा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

चाळीसगाव  – 

करोना आपत्ती काळात शहरातील वसुंधरा फाउंडेशन अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. चाळीसहगावत लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना घरबसल्याच आँनलाईन चित्रकला प्रशिक्षण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन वसुंधरा फाऊंडेशनच्यातर्फे करण्यात आले होते.

कोरोना या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी कोरोना व्हायरस संसर्ग टाळणे हा सर्वात मोठा उपाय असून त्यासाठी घरीच राहणे हा मोठा उपाय आहे.

यासाठी वसुंधरा फाउंडेशन च्या माध्यमातून चित्रकार खैरनार यांनी त्यांच्या रंभाई आर्ट गॅलरीत येथुन फेसबुकच्या मार्फत विद्यार्थ्यांना घरी राहून चित्रकला प्रशिक्षण दिले. चित्रकार धर्मराज खैरनार यांनी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने चित्र रेखांकन कसे करायचे,निसर्ग चित्र , स्मरण चित्र ,रंग काम याबद्दल प्रात्यक्षिक व मार्गदर्शक दिले. अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या यावेळी प्रशिक्षणाचा आंनद घेतला.

घरबसल्या आवडते चित्र काढून 27 तारखे पर्यंत बालचित्रकारांनी चित्रकला स्पर्धेचे सहभागी होण्यासाठी आपल्या घरीच राहून आवडत्या विषयजावर चित्र नाव काढून त्यावर वय मोबाईल नंबर टाकून मेल आय डी वर पाठवावीत अथवा धर्मराज खैरनार यांच्या फेसबुक पेजवर आपलोड करावे असे आव्हान अध्यक्षा धरती सचिन पवार, सचिव सुनिल भामरे, गजानन मोरे, देवेन पाटील, रविराज परदेशी, सचिन पवार यांनी केले आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे वसुंधरा फाउंडेशन तर्फे दिली जाणार आहेत .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!