ऑनलार्इन फसवणुक झालेल्या खातेदारांचे पैसे केले परत

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी

0

नाशिक | सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाटयाने प्रगती झाली असुन खेडोपाडयांमध्ये
इंटरनेट सुविधा पोहचलेली आहे. तसेच मोबार्इल इंटरनेट सुविधा पुरविणा-या कंपन्यांच्या सुलभ सुविधेमुळे
प्रत्येक नागरीक आता स्मार्टफोन वापरत आहेत.

केंद्राने जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करण्यासाठी आवाहन केले, मात्र गेल्या अनेक दिवसांमध्ये मोबार्इलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याचे प्रकारदेखील घडले आहेत.

नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीसांनी जिल्हयातील चांदवड, येवला, मनमाड, निफाड, इगतपुरी येथील
नागरीकांच्या ओटीपी व्दारे झालेल्या फसवणुकीची कसून चौकशी करत 1 लाख 43 हजार 413 रूपये रक्कम विविध
तक्रारदारांना परत मिळवुन दिली आहे.

तसेच सोशल मिडीयावर प्रसारित होणा-या आक्षेपार्ह पोस्ट, फोटो/व्हिडीओ क्लिप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्टिटर वरील फेक अकाउंटस् अशा विविध प्रकारच्या तक्रारींबाबत सायबर पोलीसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून कारवाई केली आहे.

कुठलीही बँक अथवा बँकेचे प्रतिनिधी फोन, र्इ-मेल व वैयक्तिकरित्या खातेदारास त्याचे बँक अकाउंट व पासवर्ड बद्दल
विचारणा करत नाही. तरी नागरीकांनी आपले बँक खाते/डेबिट कार्डची गोपनीय माहिती, पासवर्ड किंवा
मोबार्इलवर आलेला ओटीपी कोणासही देऊ नका असे आवाहन करण्यात आलेआहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सायबर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक तुषार आढाव, मपोना सोनाली पाटील, आरती पारधी, पोकॉ परिक्षित निकम, प्रमोद जाधव, गौरव गांगुर्डे, मपोकॉ प्राजक्ता सोनवणे या पथकाने ऑनलार्इन फसवणुकीच्या तक्रारींमध्ये तक्रारदारांना पैसे परत मिळवुन दिले आहेत.

LEAVE A REPLY

*