Type to search

Breaking News Featured गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये चर्चा ‘व्हॉट्सअँप बाप्पाची’

Share

नाशिक | गुंजन दुसानिस/मानसी खैरनार 

दरवर्षी वेगवेगळ्या ट्रेंड्सला धरून गणेशोत्सव साजरा केला जातो. वर्षभरात चर्चेत असलेल्या एखाद्या मुद्द्याला धरून अनेकजन गणरायाची सजावट करतात. जिओने माफक दरात इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर सोशल मिडीयाच्या वापरात मोठी वाढ झाली. तेव्हापासून अनेकजन ऑनलाईन राहू लागले आहेत.

नाशिकमध्ये गणरायाचे आगमन झाल्यानंतर एका गृहस्थाने ‘ऑनलाईन बाप्पा’ साकारला असून इमोजीजचा प्रभावी वापर करून हा बाप्पा सजविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बाप्पा ऑनलाईन आहे; तसेच बाप्पा विराजमान झाल्यानंतर स्वत: या गृहस्थाला धन्यवाद देताना दिसून येत असल्याचेही दाखविण्यात आले आहे.

सध्या या बाप्पाची सर्वत्र चर्चा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया या गजरात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात मुशकवाहन वर बसून गणरायाचे   पारंपारिक रूप आता ऑनलाईनच्या जगात बदलेले दिसून येत आहे.

सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातील समाजाचा व्हॉट्सअपकडे वाढता कल यामुळे सुरज अडवाणी यांनी व्हॉट्सअप वरील ऑनलाइन बाप्पा ही थीम निवडली असून यातील कल्पक सजावट ही लक्ष्य वेधून घेत आहे. आजची तरुण पिढी कशी मोबाइलच्या आहारी गेली आहे असा संदेश या देखाव्यात दर्शविण्यात आल्याचे अडवाणी यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

सतत ऑनलाइन असणारी तरुण पिढी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हॅटसअपचा मोठया प्रमाणात वापर करते, परंतु प्रत्यक्ष संवाद साधत नाही यामुळे त्यांनी बाप्पा देखील ऑनलाइन दाखवले आहे.

त्याचबरोबर संवाद साधतांना शब्दांपेक्षा इमोजीचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे आकर्षक पध्दतीत इमोजीचे प्रदर्शन केले आहे. यात सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळावा असा संदेश त्यांनी समाज्यापुढे मांडला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!