Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अडीचशे क्विंटल कांद्याचा ट्रक घेऊन चालक फरार; मुंगसे येथील व्यापाऱ्याला ४ लाखांना चुना

Share
कांदा घसरला; उत्पादकांना धसका, Latest News Onion Rate Down Ahmednagar

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव तालुक्यातील मुंगसे बाजारसमितीमधून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा बंगरूळ येथे पोहोचविण्यासाठी मालेगाव येथील एका ट्रकमध्ये भरला होता. त्यानंतर ट्रक चालक नियोजित स्थळी पोहोचलाच नाही. दरम्यान, फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस ठाणे गाठून व्यापाऱ्याने फिर्याद दाखल केली.

अधिक माहिती अशी की, ३० जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंगसे येथील जयेश सुरेश शाह यांच्या आडत दुकानातून ट्रक क्रमांक एमपी ०९, एच एच ९१२६ चालक अब्दुल, क्लीनर जावेद व मालक खालिक सर्व राहणार (खाचीकडी थाना, ता. सहारनपूर, जिल्हा राजगड मध्यप्रदेश. यांच्या ट्रकमध्ये २५०९० किलोच्या ५३३ कांद्याच्या गोण्या  भरून बंगळूरकडे निघाले होते.

दरम्यान, मालक आणि चालक यांनी संगनमत करून ट्रकमधील मालाची परस्पर विल्हेवाट लावली. दरम्यान, संबंधीत चालक आणि मालकाशी कुठलाही संपर्क होत नसल्याने फसवणुकीचा गुन्हा मालेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मालेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले अधिक तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!