Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कांदा साठवणुकीवर 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

Share

जिल्ह्यात साठेबाजांवर कारवाईचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध लागू केलेले असून घाऊक 50 मे.टन व किरकोळ व्यापार्‍यांसाठी 10 मे.टन कांदा साठा निश्चित करण्यात आलेला आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांविरुध्द सक्त कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

राज्य शासनाने ही कांदा साठवणुकीवर घाऊक व्यापार्‍यांसाठी 50 मे.टन व किरकोळ व्यापार्‍यांसाठी 10 मे.टन साठ्यावरील निर्बंध लागू केले असून ते दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत लागू राहणार आहेत. या निर्णयाने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानात कांद्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

परिणामी कांद्याच्या भावाने साठी गाठल्याने ग्राहक वैतागले आहेत. कांद्याचे भाव नियंत्रणात रहावेत यासाठी सरकारकडून उपाय योजले जात आहेत.

जिल्ह्यात नागरिकांना कोठेही बेकायदेशीर साठेबाजी निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागास दूरध्वनी क्रमांक 0241-2320236 वर संपर्क साधावा. बेकायदा साठेबाजीचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍याविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!