Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जायखेडा : सव्वालाखाचा कांदा चाळीतून लंपास

Share

जायखेडा । वार्ताहर

अतीवृष्टीमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान होत असतांना दुसरीकडे कांद्याने साडेपाच हजारावर मजल गाठली आहे. या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी आता कांदा चोरीकडे आपला मोर्चा वळविल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बागलाण तालुक्यातील अंतापूरच्या रावेर शिवारात अज्ञात चोरट्यांनी चाळीतून कांद्याच्या 40 गोण्या लंपास केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याबाबत मुश्ताक इसाक शेख यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यांच्या शेतातील कांदा चाळीत ठेवलेल्या 65 पैकी 40 कांद्याच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या.

चोरीस गेलेल्या कांद्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 1 लाख 30 हजार रूपये असून सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी लोखंडी गेटची साखळी व कुलूप तोडून वाहनातून कांद्याच्या गोण्या लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जायखेडा पोलीस ठाण्यांतर्गत मोसम-करंजाडी खोर्‍यातील 92 गावे असून पोलीस संख्याबळ कमी असल्याने चोर्‍या व गुन्ह्यांचे प्रकार वाढले आहेत. यास्तव पोलीस संख्याबळ वाढवावे, अशी मागणी माजी सरपंच साहेबराव गवळी यांच्यासह नागरीकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!