कांदा आवक टिकून; दर स्थिर असल्याने लिलाव सुरळीत

0
नाशिक । कांद्याच्या सरासरी दरात पंधरा दिवसांपूर्वी झालेली मोठी घसरण , सध्या सुधारलेली आहे. बाजार समित्यांत सध्या होत असलेली आवक पुरेष असल्याने दर स्थितर आहेत. कांदा आवक टिकून आहे.पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवक दसर्‍यापूर्वी सुमारे 19000 क्विंटल होती.

लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक त्याच दिवशी सुमारे 24 हजार क्विंटल होती. उमराणा आणि चांदवड बाजार समितीत कांद्याची आवक सुमारे 33 हजार क्विंटल होती. तर येवला, निफाड, अंदरसुल आणि वणी बाजार समितीत कांद्याची आवक चांगली झाल्याने लिलावात कांदा उठाव अधिक होता.पिंपळगाव बाजार समितीत  शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला कमीत कमी 900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.

सर्वोच्च दर प्रतिक्विंटल 1861 रुपये आणि सरासरी दर 1500 रुपये प्रतिक्विंटल होता. शनिवारी दसरा आणि रविवारी समितीत लिलाव बंद राहणार असल्याने पिंपळगाव बाजार समितीत काद्याची आवक नेमिी पेक्षा अधिक झाली होती.लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सर्वाधिक कांदा आवक झाली होती.

इतर बाजार समित्यांपेक्षा येथील कांद्याची सरासरी, सर्वोच्च आणि किमान दर कमी होते तरीही कांदा आवक लिलावात अधिक होती बाजार समितीत सुमारे 24 हजार क्विंटल आवक झालेली होती. सरासरी दर 1451 रुपये प्रतिक्विंटल, सर्वोच्च दर 1797 रुपये क्विंटल तर कमीत कमी दर 647 रुपये क्विंटल होता.  उमराणे बाजार समितीत कांदा वाहनांची लिलावाला आलेली लक्षणीय गर्दी झालेली होती.

या बाजार समितीत एकाच दिवशी सुमरीे 21000 क्विटल कांदा विक्रीस आला होता. त्यामूळे लिलाव प्रक्रिया बराच वेळ सुरु होती.  कमीतकमी दर प्रतिक्विंटलला 851 रुपये मिळाला तर सर्वोच्च दर 1670 रुपये क्विंटल तर 1495 रुपये प्रतिक्विंटल दर सरासरी होता.सायखेड्यात उपआवारात दर कमीशुक्रवारी सायखेडा उपबाजार आवारात सुमारे 10 हजार क्विंटल कांदा आवक झाली होती.

मात्र इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथील बाजार समितीत कांद्याचे दर कमी होते. कमीत कमी पाचशे रुपये, सर्वाधिक 1571 रुपये आणि सरासरी 14 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्री झाला. चांदवड बाजार समितीत कांद्याची आवक वाढलेली होती. सुमारे 12 हजार क्विंटल कांदा लिलावात होता. येथे कमीत कमी दर 786 रुपये, कमाल 1581 रुपये तर सरासरी दर 1300 रुपये क्विंटल दराने विक्री होत होता.

LEAVE A REPLY

*