कांद्याच्या भावात घसरण

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या कांदा आयतीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व केरळच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळायाच्या तडाख्यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून पावसाची शक्यता गृहित धरल्याने धास्तावलेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. परिणामी कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असलेल्या उत्पादकांना कमी भावाचा धक्का सहन करावा लागला. राज्यात पुणे, लासलगावसहसह अनेक ठिकाणी भाव कमी निघाले. राहुरीत नंबर एकच्या कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 3500 तर पारनेरात 3300, पाथर्डीतील तिसगावात 3000 रूपये निघाले. गत आठवड्यात हेच भाव पाच हजाराच्या पुढे गेले होते.

 

यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हळवा कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे गत आठवड्यात नगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गावरान कांद्याच्या भावाने पाच हजारी गाठली होती. त्यामुळे भेळीच्या गाड्या, हॉटेल्समधून कांदा गायब झाला होता. त्याबदल्यात कांद्याची पात, कोबी, काकडी, टोमॅटोचा वापर वाढला होता.

 

कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आणि पुण्यात इजिप्तचा कांदा आला देखील. परंतु सर्वसामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे परदेशातून कांदा आयात करून देखील दरामध्ये फार फरक पडला नाही. परंतु शासनाकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जाता आहे. यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. तर सध्याचे ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पिक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकर्‍यांनी नवीन हळवा कांद्याचा हंगाम सुरु होण्यास दोन आठवडे शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे.

 

दर पडण्याच्या भिंती आवक वाढली. वाढलेली आवक त्यात कच्च्या कांद्याला उठाव न झाल्याने कांद्याचे भाव गडगडले.

 

राहुरी तालुका प्रतिनिधीने कळविले, राहुरी बाजार समितीत काल (दि. 01) झालेल्या लिलावात एकूण 19 हजार 713 गोण्या कांद्याची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिरावली असली तरी गावरान कांद्याच्या भावात सुमारे 1500 रुपयांची तर लाल कांद्याच्या भावात 900 रुपयांची घसरण झाली आहे.

 

काल गावरान कांद्याची 3 हजार 929 तर लालकांद्याची 15 हजार 84 गोण्यांची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या एक नंबरच्या गावरान कांद्याला 2500 ते 3500, दोन नंबर 1700 ते 2475, तीन नंबर 700 ते 1690, तर गोल्टी कांदा 1400 ते 2200 रुपयांनी विकला गेला.

 

चांगल्या दर्जाचा एक नंबरचा लालकांदा 2100 ते 3100, दोन नंबर 1300 ते 2075, तीन नंबर 300 ते 1290 तर गोल्टी कांदा 1200 ते 2000 रुपये या भावाने विकला गेला.
राहाता तालुका प्रतिनिधीने सांगितले की, राहाता बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात 12 हजार 662 गोणी कांद्याची आवक होऊन एक नंबर कांद्यास 2500 ते 3500 रूपया पर्यंत बाजारभाव मिळाले. दोन नंबर कांद्यास 1500 ते 2400 रुपये क्विंटल, तिन नंबर कांद्यास 900 ते 1400 रुपये, गोल्टी कांदा 2000 ते 2200 रूपये, जोड कांदा 800 ते 1000 रूपये पर्यंत बाजार भाव मिळाले.

 

पारनेर प्रतिनिधीने कळविले की, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली भाव कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसून आली.बाजार समितीत शुक्रवारी 23783 गोण्याची आवक झाल्याने बाजारभाव मागील निलावा पेक्षाही 10ते 12रू नी कमी झाले असून शेतकर्‍यांनी कच्चा माल बाजारात आल्यामुळे भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. एक नंबरचा कांदा 2000 ते 3300दोन नंबरचा 1500ते 2000 तीन नंबरचा 1000ते 1500 गोल्टि कांदा 400 ते 1000 अशा प्रकारचे बाजारभाव झालेल्या निलावात राहिले आहेत.

 

पाथर्डीतील तिसगावात 4500 गोणी कांद्याची आवक झाली. त्यात 1 नंबर कांद्याला 3हजार रूपये 2 नं. 2300 ते 2400, 3 नं. 1500 ते 2000 रूपये असा भाव मिळाला. अकोले प्रतिनिधीने कळविले की, गुरूवारी झालेल्या लिलावात कांद्याला 1100 ते 3700 रूपयांचा दर मिळाला.

 

पुण्यातही कमी दर
गुलटेकडी मार्केट यार्ड येथे संगमनेर विभागातून व श्रीगोंदा परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळवी कांद्याचे 200 ते 220 ट्रक आणि जुन्या कांद्याचे 15 ते 20 ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्ये देखील मोठी घट झाली. सर्वसाधारण कांद्याला 270 ते 280 दर देण्यात आले. तर संगमनेर विभागातील कांद्याला 220 ते 280 , श्रींगोदा परिसरातील कांद्याला 150 ते 250 रुपये दहा किलो आणि जुन्या कांद्याला 300 ते 360 रुपये दहा किलो दर देण्यात आला.

LEAVE A REPLY

*