Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कांदा आणखी कडाडणार

Share

कांदा मतदारांसह उमेदवारांचाही ‘वांदा’ करण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राजकारणी व्यस्त असून, सर्वसामान्य जनता मात्र कांद्याच्या वाढत्या दरामुळे चिंताग्रस्त झाली आहे. महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेशातील कांदा महाराष्ट्रात येणे बंद झाले आहे. या राज्यांनाच आता महाराष्ट्रातून कांदा पुरविला जात आहे. नवीन कांदा लागवडही उशिरा झाल्याने येत्या महिनाभरात कांदा किरकोळ बाजारात 50-60 रूपयांची पातळी गाठणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाले आहे.

स्थानिक किरकोळ बाजारात कांदा 60 रुपयांपर्यंत विकला जाण्याची शक्यता असून, निवडणुकीत कांदा मतदारांसह उमेदवारांचाही ‘वांदा’ करण्याची शक्यता आहे. सध्याच कोल्हापूर, मुंबईत कांदा 50 रुपये आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी येणारा कांदा हलक्या प्रतीचा असल्याने तो फार काळ टिकणारा नाही. तसेच दक्षिणेतील नवीन कांदा सप्टेंबरच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. एकीकडे वरुण राजाने रौद्र रूप धारण केल्यामुळे बळीराजाच्या डोळयात अश्रू आणले असताना दुसरीकडे महिन्याभरात कांद्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पावसामुळे नवीन कांदा लागवडीस महिनाभर उशीर झाला असल्याने, नवीन कांदा बाजारात डिसेंबर महिन्यामध्ये विक्रीला येईल. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये प्रती क्विंटल 2300 ते 3500 रुपये दराने कांदा विकला जात असून, स्थानिक बाजारात 30 ते 40 रुपयांपर्यंत कांदा विकला जात असल्याची माहिती तालुकास्तरीय बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांनी दिली.

कांद्याचे भाव शंभरी गाठण्याची शक्यता होती. पण सरकारने याची दखल घेऊन निर्यातमूल्य वाढविले आहे. तसेच कांदा आयातीचा निर्णय घेणार असल्याने कांद्याच्या भावातील तेजी रोखली गेली आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना भाववाढ डोकेदुखी ठरणार आहे. या कांद्याच्या दरवाढीचा फटका सरकारांना बसलेला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!