Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कांद्याची वाटचाल तीन हजाराकडे; भाव वधारल्याने बळीराजा समाधानी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मातीमोल किमतीत विक्री होणाऱ्या कांद्याला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारी पार केलेला कांद्याची वाटचाल तीन हजार रुपये प्रती क्विंटलकडे झाली आहे. आज जिल्ह्यातील बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जवळपास सर्वच बाजार समितीत कांदा अडीच ते तीन हजार रुपयांत विक्री झाला. नेहमीच कांद्याच्या भावावरून संकटात सापडणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे.

यंदा जिल्ह्यात उशिराने पावसाचे आगमन झाले. यामुळे खरीपाला उशीर झाला. अनेक भागांत दुबार पेरण्या झाल्या, काही ठिकाणी तर अजूनही पडीक क्षेत्र आहे.

यातच सर्वत्र लष्करी अळीने डोके वर काढल्याने खरीपावर मोठे संकट कोसळले. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केल्यामुळे अतिरिक्त खर्च भांडवलरुपी शेतकऱ्यांना खर्च करावे लागले. तरीही उत्पन्नाची शाश्वती नाही. यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला होता. मात्र, साठवून ठेवलेल्या कांद्याला गेल्या काही दिवसांपासून बाजारात चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी बघायला मिळत आहेत.

मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा 

वाढलेल्या कांद्याच्या दरांचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना झाला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणूक करण्यासाठी चांगल्या प्रतीची व्यवस्था होती त्यांचा कांदा चांगल्या स्थितीत आहे. तर, जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे नुकसान झाले यामध्ये कांद्यासह चाळ जमीनदोस्त झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

व्यापाऱ्यांची चंगळ

ग्रामीण भागातून अनेक व्यापाऱ्यांनी कमी किंमतीत कांदा खरेदी करून साठवून ठेवला होता. त्यामुळे कांद्याच्या वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक झाल्याचे काही शेतकऱ्यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!