कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप; देवळा-कळवण रस्ता रोखला

0
देवळा (महेश सोनकुळे) | इतर बाजार समित्याच्या तुलनेत देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव कमी आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी देवळा कळवण रस्ता काही काळ रोखून धरला होता.

ऐन सानासुधीच्या काळात कांद्याचे दर कमी असल्यामुळे शेतकरी संतापले होते. रस्ता रोखो झाल्यानंतर बाजार समितीचे सभापती अशोक आहेर यांनीदेखील शेतकऱ्यांना पाठींबा देत भाववाढीबाबत सांगितले.

व्यापाऱ्यांची मनमानी कुठल्याही प्रकारे सहन केली जाणार नाही. मीसुद्धा आधी एक शेतकरी आहे त्यानंतर सभापती आहे. माझा या रास्ता रोकोला पूर्णपणे पाठींबा आहे.

रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर दुपारनंतर लिलाव पूर्ववत करण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*