Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिवाळीच्या तोंडावर कांदा दरात घसरण; निर्यातबंदीचा शेतकरी आणि व्यापाऱयांना फटका

Share

नाशिक । प्रतिनिधी 

कांद्याची आवक कमी आणि मागणी जास्त असूनदेखील कांदयाच्या दरात घसरण सुरूच असून दोन आठवड्यांपूर्वी पाच हजाराचा टप्पा ओलांडणारे कांद्याचे भाव आज (दि.१५) २८०० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. सरकारने निर्यातबंदी लागू केल्यानंतर व व्यापाऱ्यांना साठवणुकीसाठी मर्यादा घालून दिल्यामुळे गेल्या आठवड्यापासून कांदयाच्या दरात मोठी घसरण सुरु आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नुकसान सोसावे लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गृहिणींना ५० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्यावा लागत असल्याने व त्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे असल्याने सरकरने हस्तक्षेप करून कांदयाचे भाव पाडले . या निर्णयाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच बसला आहे. कारण कर्नाटक, आंध्रातील कांदा दिवाळीदरम्यान बाजारात येणार होता. तर पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले. परिणामी नाशिकमधील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा भाव खाऊन गेला.

निवडणुकीत कांदा रडवेल या भीतीने सरकारने आयातीला परवानगी देतानाच निर्यातमूल्यात मोठी वाढ केली. देशातील बाजारात कांद्याचे दर वाढू नये आणि पुरेशी\ उपलब्धता किरकोळ बाजारात असावी यासाठी सुरुवातीला ८५० डॉलर निर्यातमूल्य जाहीर केले. त्यानंतर निर्यात बंदी केली आणि व्यापारी वर्गाने ५०० क्विंटलच्या वर कांद्याची साठवणूक करू नये असे आदेश सरकारने काढले. त्यामुळे नुकसान सोसावे लागल्याने  कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला.

निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती ३५०० रुपये सरासरी भाव टिकून असताना गेल्या आठवडाभरात पिंपळगाव, लासलगावच्या च्या बाजार आवारात पुन्हा ७०० रुपये घसरण होऊन भाव २८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कधी नव्हे ते कांद्याला चढा भाव सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वर्षभर सांभाळून ठेवलेला कांदा मोठा फायदा मिळवून देत असतानाच निर्यातबंदी लादून सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचा सूर आहे.

किंमत नियंत्रण करताना व्यापाऱ्यांना देखील साठेबाजी करायला सरकारने ५०० क्विंटलची मर्यादा घालून दिली असल्याने व्यापाऱ्यांनी देखील खरेदी थांबवली आहे. परिणामी दिवाळी सणासाठी बाजरात कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

नाशिकमधील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला कांदा असून बाजारात अन्य ठिकाणचा कांदा यायला उशीर असल्याने चांगला भाव मिळत असताना सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दरवाढीच्या आश्वासक उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आंध्रातील शेतकऱ्यांनी तेथील बाजारपेठेत स्थानिक कांदा आणायला सुरवात केली असून आपल्याकडील कांद्याला असणारी मागणी देखील आपसूक घटली आहे.

टोमॅटोदेखील ग्राहकांना रडवणार 

कांद्यानंतर आता टोमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे. बाजारात टोमॅटोने २० ते ३० रूपयांवरून थेट ८० रूपयांवर उसळी मारली आहे. टोमॅटो उत्पादक क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे आवक कमालीची घटली असून  भाव शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे कांद्याच्या दरांनी उचल खाल्ली असतानाच टॉमॅटोचाही भाव वधाला आहे. किरकोळ बाजारात टॉमेटोचे दर किलोमागे ८० रुपयांपर्यंत  गेले आहेत. घाऊक बाजारात ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे  ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा फटका टॉमॅटोच्या पिकाला बसल्याने टोमॅटो महाग झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!