कांदा दरात घसरण सुरूच; कांदा साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल

0
धुळगाव (पांडुरंग शेळके ) | येवला लासलगावसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत वेगाने कांदा भावात घसरण होत आहे. जानेवारीमध्ये सर्वात जास्त क्विंटल कांदा लिलावात येत होता. तरीही किमान १५००, कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रुपये होते. मार्चच्या पहिल्या सप्ताहानंतर लिलावात किमान, कमाल व सरासरी भावात यावर्षी विक्रमी वेगाने घसरण होत आहे सद्याची आवक बघता लिलावात किमान ५००, कमाल भाव १००० तर सरासरी ७०० रुपये भाव मिळत आहे.

उत्पादनात वाढ; निर्यातीची गती मंदावली : येवला,मनमाड,विंचूर : या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल झाल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून, निर्यातमूल्याचाही परिणाम झाल्याने कांदा उत्पादक चिंतित झाले आहेत.

लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक सुरू आहे.  देशांतर्गत गुजरात, मध्य प्रदेशबरोबर महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील कांद्यानेही बाजार समित्यांमध्ये दमदार आगमन केले आहे. याचा एकत्रित परिणाम होत आवक जास्त आणि मागणी कमी या सूत्रानुसार झाला आहे.

देशाची गरज भागवून कांदा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे; मात्र निर्यातमूल्या शुन्य असताना देखील परदेशी ग्राहकांना भारतीय कांदा का परवडत नाही स्थानिक खरेदीदार व निर्यातदारांनी कांदा खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.

कांदा निर्यातीसाठीची प्रक्रिया पूर्ण करताना लेटर आॅफ क्रेडिट (एलसी) याची पूर्तता करावी लागते; मात्र  क्लिष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने निर्यातदाराची मनोभूमिका निर्यात करण्याची राहिली नसल्याने केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची सर्वच क्षेत्रातुन उमटत आहे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सद्यस्थितीत कांद्याचे दर सुमारे हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादकांच्या पदरी निराशा पडल्याने सकारात्मक धोरण सरकारने राबवावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने केली जात आहे.

कांदा एकमेव उत्पादनाचे साधन : धुळगाव येवला तालुक्यातील एकमेव असे गाव आहे की ते फक्त कांदा पिकावर अवलंबून असते तर गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची शेती तोट्यात येऊ लागल्याने शेतकऱ्याने डाळिंबाची झाडे उपटून टाकली.

डाळिंबाची शेती कमी होऊन कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली. आता शेतकऱ्यांकडे कांदा एकमेव उत्पादनाचे साधन राहिले तेव्हा शेतकरी कांदा पिकाकडे वळला. हमखास पैसे देणारे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळत नव्हता, त्यामुळे कांद्याचे पीक तोट्यात येत असे. परंतु गेल्या वर्षी उन्हाळी काढणीच्या हंगामात कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नव्हता. तेव्हा काही शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला.

सप्टेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याच्या भावात वाढ झाली. याचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांना झाला. तेव्हा हा उन्हाळी कांदा साधारण तीन ते चार हजारांच्या आसपास विकला जाऊ लागल्याने शेतकऱ्याने उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांद्याचे भाव स्थिर होते. वातावरणात सतत बदल होत गेला तरी कांद्यावर महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक चांगले आले आहे. तरीही कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे.या प्रमाने जर कांद्याच्या भावात घसरण होत राहिली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेलआणि पुन्हा एकदा कर्ज बाजारीपणाला सामोरे जावे लागेल यात काही शंकाच नाही.

बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे. राज्य शासनाने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे किंवा कांद्याला प्रतिक्विंटल मागे ५०० रुपये अनुदान द्यावे, उन्हाळ कांद्याची साठवण चाळीत झालेली असताना निवडून उरलेला कांदा आता शेतकरी बाजारात आणू लागल्याने आवक वाढली. यामुळे बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे.

संतु पाटील झांबरे : उत्तर महाराष्ट्र प्रमुख शेतकरी संघटना.

सध्या मार्केटमध्ये येणाऱ्या कांद्याचा स्तर आणि गुणवत्तादेखील चांगल्या दर्जाची आहे. यावर्षी निसर्गाने बऱ्यापैकी साथ दिल्याने मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. प्रारंभी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनीनी कांदा लागवडीवर भर दिला. मात्र सध्या कांदा बाजारभावात होणारी घसरण पाहता शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दर्शवित आहे.

विठ्ठल शेळके, कांदा उत्पादक शेतकरी धुळगाव

LEAVE A REPLY

*