Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लासलगावी उन्हाळ कांद्याला ५ हजार ६०० रूपये भाव

Share

लासलगांव | वार्ताहर

येथील बाजार समितीच्या   मुख्य आवारात   आज   उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव मिळाला. ९५ वाहनातील ११६४ क्विंटल कांदा २५९० ते ५६०० रूपये भाव मिळाला.

लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४२९० ते सरासरी २८३० रूपये भावाने विक्र ी झाला. कांद्याचे भाव क्विंटलला सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करीत आहे.

आयातीची एमएमटीसी या सरकारी कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशातील जनतेला एक लाख टन आयात कांद्याचे वितरण करण्याची जबाबदारी नाफेडवर सोपवल्याचे सरकारने जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले.

मागील तीन महिन्यांपासून कांद्याच्या किमती वाढल्यापासून सरकारने आॅगस्टच्या अखेरीस कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढवून ते टनाला ८५० डॉलर केले.

नंतर कांद्याची निर्यात बंद करून दोन हजार टन कांदा आयातीची निविदा काढली. त्याचबरोबर सरकारने कांदा साठवण्याबाबतही व्यापारयांवर निर्बंध घातले.

नाशिक जिल्ह्यात कांदा हे नगदी पीक असून ते दुष्काळी भागातील शेतकºयांसाठी अर्थकारण पूर्णत: अवलंबून आहे. आता नाफेडच्या माध्यमातून आयात कांदा वितरण करणार असल्याचे बोलत आहे.

मात्र, गेले तीन मिहन्यांपासूनच सरकारने देशातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून तो नाफेडमार्फत ग्राहकांना वितरीत केला असता तर देशातील शेतकऱ्यांचे व ग्राहकांचेही साधले गेले असते, असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!