राहुरीत कांद्याने 5 हजारी ओलांडली

0

पारनेरात 4600 भाव

राहुरी- पारनेर (प्रतिनिधी)- कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात तेजी आलेली आहे. राहुरीमध्ये झालेल्या कांदा लिलावामध्ये कांद्याला 5 हजार 200 रुपये तर पारनेरमध्ये कांद्याला 4 हजार 600 रुपये भाव मिळाला. कांद्याने पाच हजारी ओलांडल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याचे भाव असे टिकून राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राहुरी बाजार समितीत काल 14 हजार 174 गोण्या कांद्याची आवक झाली. काल गावरान कांद्याची 5 हजार 703 तर लाल कांद्याची 8 हजार 471 गोण्यांची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या एक नंबरच्या गावरान कांद्याला 3500 ते 5200, दोन नंबर 2000 ते 3475, तीन नंबर 700 ते 1990, तर गोल्टी कांदा 3000 ते 4200 रुपयांनी विकला गेला. चांगल्या दर्जाचा एक नंबरचा लालकांदा 3000 ते 4600, दोन नंबर 1600 ते 2975, तीन नंबर 500 ते 1590 तर गोल्टी कांदा 2200 ते 3500 रुपये या भावाने विकला गेला.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 हजार 630 गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3 ते 4 हजार 600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. नवीन कांद्यांची आवाक वाढू लागली असून पक्व झालेला कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे. खराब कांद्याला अवघा 100 ते 400 रुपयांचाच भाव मिळाला आहे. खराब माल जास्त असल्यानेच चांगल्या मालाचा भाव वाढत आहे.

LEAVE A REPLY

*