कांदा,मका व सोयाबीनला बाजारात मंदी राहणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 दरम्यान पिकांच्या संभाव्य किंमतींचा अहवालानूसार कांदा, मका व सोयाबीन पिकाला बाजारात मंदी राहणार असल्याचे चित्र आहे. भारतीय कृषी विपनन माहिती व विश्‍लेषन केंद्रतंर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प किंमतीचा अहवाल जाहीर केला आहे.
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे पिक.केवळ भारत देशात नव्हे तर, जगातील उत्पादन व उमभोग करणारर्‍या देशातील मागणी व पुरवठा याचा परिणाम होतो.सन 2016-17 या हंगामााठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 2775 प्रति क्किटंल होती.2017-18 च्या खरीप हंगामासाठीच्या किमान आधारभूत किंमती जाहीर होणे बाकी आहे.
युएइडीए या अहवालानूसार चालू वर्षात सोयाबयीनचे उत्पादन11.50 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.गत दोन वर्षातील इंदुर बाजारातील सोयाबीनच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती प्रति क्किटंलमध्ये पुढीलप्रमाणे- 2015-3765 व 2016-3057 रुपये. 23 मे 2017 रोजीच्या इंदूर बाजारातील सोयाबीनच्या प्युचर्स किंमती प्रति क्किटंलमध्ये खालील प्रमाणे- जुन 2017:2782, जुलै-2017:2850, ऑगस्ट-2017:2909,ऑक्टोबर 2017: 2961, नोव्हेंबर 2017: 3013, डिसेंबर 2017: 3065 रुपये आदी.गत काही वर्षातील किंमतीचे अर्थमिती विश्‍लेषण बाजारातील सद्यस्थिती व सरासरी पाऊस आल्यास 2017मध्ये इंदुर बाजारात ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या संभाव्य सरासरी किंमती दरम्यान राहतील असे अपेक्षित आहे.
कांदा महत्वाचे व्यावसायिक भाजीपाला पिक आहे. नाशवंत पिक असल्याने किंमतीमध्ये अस्थिरता जाणवते.मार्च ते मे 2017 दरम्यान 500 रुपये क्किटंल दर होता.जागतिक कांदा उत्पादनात चिननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांदा उत्पादनात देशाचा 20 टक्के वाटा आहे.महाराष्ट्रात देशाच्या एकूण 28 टक्के कांदा उत्पादन घेतले जातात.
रब्बी कांदा उत्पादनाच्या अंदाजामुळे सरकारने किमान निर्यात मुल्य हटविले आहे. नाशिक, पुणे, सातारा, जळगांव, धुळे,नगर, नागपुर व सोलापुरही महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहेत.गत दोन वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लासलगांव बाजारातील कांद्याच्या सरासरी किंमती प्रति क्किटंल अशा: 2015-1260 व 2016-791 रुपये. गत 12 वर्षातील कांद्याच्या किंमतीच्या विश्‍लेषण व बाजारातील सद्यस्थितीवरुन 400 ते 600 प्रतिक्किटंल या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.
सन 2016-17 मध्ये जागतिक मका उत्पादनात भारताचा 2.6 टक्के वाटा होता. 73 टक्के उत्पादन खरीप हंगामात होते. उर्वरीत रब्बी हंगामात घेतले जाते.मक्याच्या किंमतीवर गुणवत्ता, आर्द्रता, पुरवठा व मागणी याचा परिणाम होतो.
एप्रिल व मे 2017 या महिन्यामध्ये निझामाबाद या बाजारातील मक्याची सरासरी 1460 रुपये प्रति क्किटंल इतकी त्याचबरोबर मक्याच्या वायदे बाजारातील सध्याच्या किंमती वाढता कल दर्शवित राहिली आहे.2016-17 मध्ये मक्याची किमान आधारभूत किंमत 1365 प्रति क्किटंल इतकी होती.
यंदाची किंमत अद्याप निश्‍चित करण्यात आली नाही.निझामाबाद बाजारातील मक्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सरासरी किंमती पुढीलप्रमाणे 2015-1296 व 2016-1496 प्रतिक्किटंल. 25 मे 2017 रोजी वायदे बाजारातील मक्याच्या किंमती-जुन 2017-1445,जुलै 2017-1472 व ऑगस्ट 2017-1545 रुपये प्रति क्किटंल. 2017 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मक्याची संभाव्य सरासरी किंमत 1400 ते 1600 प्रति क्किटंल दरम्यान राहतील
जगात भारत हा तूर उत्पादनात सर्वात मोठा देश आहे. अकोला बाजार पेठेतील तूरीच्या सरासरी किंमती 4200 ते 3800 प्रति क्किटंल इतक्या कमी होताना दिसतात.भारत सरकार कृषी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानूसार तूरीचे उत्पादन साधारणपणे46 लाख टन इतके आहे. गतवर्षी ते 24.60 लाख टन होते.
2016 मधील लक्षणीय उत्पादन विचारत घेता तुरीच्या किंमतीकिमान आधारभूत किंमत 5050 पेक्षा कमी झालेल्या आहेत.सध्य परिस्थितीत शेतकरी, एफपीओएइ व बाजार समिती कर्मचारी आदींच्यामते तुरीच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तुरीच्या बाजारपेठेवर गतवर्षातील तुर साठाआयात तसेच मोठ्या प्रमाणातील उत्पादन यांचा परिणाम असलेला दिसतो.2016-17 साठी तुरीची किमान आधारभुत किंमत 5050 रुपये प्रति क्किटंल इतकी आहे. तूर खरेदीचे राष्ट्रिय उदिष्ट 6 लाख मेट्रिक टन असून उदिष्टापेक्षा 94 टक्के जास्त दुर खरेदी झाली आहे. गत दोन वर्षातील तुरीच्या सरासरी किंमती: 2015-9491 व 2016-555 रुपये आदि. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अकोला बाजारपेठेतील ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 दरम्यान तूरीच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही.
टोमॅटो व्यावसायिक व आहारातील महत्वाचे भाजीपाला पिक आहे. टोमॅटो नाशवंत, कमी कालावधीचे व अधिक उत्पादन मिळुन देणारे किफायदेशीर आहे.मार्च ते मे 2017 दरम्यान पुणे बाजारात सरासरी किंमत 1 हजार प्रति क्किटंल होत्या. जागतिक टोमॅटो उत्पादनात चीन पाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो.एकूण उत्पादनात 8 टक्के वाटा आहे.
राष्ट्रिय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनूसार महाराष्ट्र राज्य देेशात टोमॅटोच्या उतपादनात 10 व्या क्रमकांवर आहे. राज्यात नाशिक, नगर, सांगली, नागपुर, सातारा, पुणे ही प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत.गत दोन वर्षात जून-जुलै महिन्यातील पुणे बाजारातील टोमॅटोच्या सरासरी किंमती अशा 2015-1930 व 2016-630 रुपये प्रतिक्किटंल आहे.

गत 12 वर्षातील किंमतीच्या विश्‍लेषण व बाजार सर्वेक्षण व बाजारातील स्थितीवरुन 2017 जुन-जुलै महिन्यात पुणे बाजारातील टोमॅटोच्या संभाव्य सरासरी किंमती 400 ते 600 रुपये प्रति क्किटंल राहण्याची अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

*