Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कांदा 5500; वांबोरीत मिळाला सर्वाधिक भाव

Share

वैजापुरात 5200, संगमनेर, अकोले, येवल्यात 5000 रुपयांचा दर

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी बाजार समिती अंतर्गत वांबोरी उपबाजारात कांद्याच्या दराने उच्चांकी उसळी घेतली.काल झालेल्या लिलावात 34 गोण्यांना सर्वाधिक 5500 रुपये दर मिळाला. तर 20 गोण्यांना 5400 रुपयांचा दर मिळाला. तसेच नगर जिल्ह्याच्या शेजारच्या वैजापुरात 1261 कांदा गोणीची आवक झाली. या कांद्याला 2000 ते 5200 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. राज्यातील संगमनेर, अकोले, येवला आणि धुळ्यातही नं. 1 च्या कांद्याला 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 5100 रुपयांचा भाव मिळाला. यामुळे कांदा उत्पादक कधी नव्हे एवढा खुश आहेतर ग्राहक मात्र जाम वैतागला आहे.

अपवादात्मक गोण्यांचे बाजारभाव- 5500रूपये (34 गोणी), 5400 (20 गोणी), 5200 (48 गोणी), 5100(78 गोणी), 5000 (213 गोणी), 4800(95 गोणी), 4700(151 गोणी), 4600(57 गोणी).  संगमनेर प्रतिनिधीने कळविले की, संगमनेर बाजार समितीमध्ये 4081 गोणी आवक झाली. त्यात 1000 ते 5000 असा भाव निघाला.

अनेक कांदा उत्पादकांची ‘लॉटरी’
निर्यात शुल्क वाढ, तसेच आयातीचा निर्णय यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असे वाटत असतानाच, दिवसागणिक दर वाढत आहे. त्यामुळे बर्‍याच वर्षांनंतर कांद्याला मनासारखा भाव मिळत असल्याने अनेक कांदा उत्पादकांची ‘लॉटरी’ लागली आहे.

वांबोरीत कांदा नं.1 – 4000 ते 4500 रुपये, कांदा नं.2 -2800 ते 3975, कांदा नं.3 -1000 ते 2775, गोल्टी- 3500 ते 4000 असे दर मिळाले.

बाजारभाव व गोणी- 4451 ते 4500 (613 गोणी), 4401 ते 4450 (48 गोणी), 4351 ते 4400 (205 गोणी), 4301 ते 4350 (42 गोणी), 4251 ते 4300 (333 गोणी), 4201 ते 4250(30 गोणी), 4151 ते 4200 (382 गोणी), 4101 ते 4150 (61 गोणी), 4051 ते 4100(179 गोणी), 4001 ते 4050(108 गोणी), 3951 ते 4000 (555 गोणी), 1000 ते 3950 (2926 गोणी).

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!