Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

15 मार्चपासुन कांदा निर्यात बंदी उठणार; वाणिज्य मंत्रालयाने खा. गोडसेंना दिली माहिती

Share

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासनाने काही दिवसापासुन कांदा निर्यात बंदी केल्यानतंर नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकर्‍यांत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहे. यासंदर्भात खा. हेंमत गोडसे यांनी वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर येत्या 15 मार्चपासुन कांदा निर्यात बंदी उठविली जाणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाचे सचिव मिश्रा यांनी दिल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

मागील आक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात कांद्याची आवक मी झाल्याने देशभरात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. काद्याचे भाव खाली यावेत म्हणुन कांदी निर्यातबंदी लागु केलेली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यापासुन कांद्याचे भाव गडगडले आहे. निर्यातबंदी नसतांना कांद्याला सुमारे 5 हजार रुपयांपर्यत भाव मिळत होता. मात्र निर्यातबंदीमुळे काद्याच्या भावात मोठी घसरण होऊन आज काद्याला बाराशे ते पंधराशे रुपये इतका भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. काही ठिकाणी कांदा मातीमोल भावाने विकला जात असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बाजारसमितीमध्ये आंदोलने सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर खा. गोडसे यांनी वाणिज्य मंत्रालयाचे सचिव मिश्रा व फॉरेन ट्रेडींगचे डायरेक्टर जनरल विजय कुमार यांच्यासोबत चर्चा केली. निर्यातबंदीमुळे निर्माण झालेल्या स्थितीची माहिती देत शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्यात आली. कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी दिवाळखोरीत निघेल अशी भिती खा. गोडसे यांनी या अधिकार्‍यांना बोलून दाखविली. याची दखल घेत संबंधीत अधिकार्‍यांनी येत्या 15 मार्चपासुन कांदा निर्यातबंदी उठविली जाणार असल्याची माहिती मिश्रा यांनी खा. गोडसे यांना दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!