शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले

0

बाजार समितीच्या व्यापार्‍यांवर आरोप

 

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कृषिउत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.
शनिवारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील शेतकर्‍यांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी कांदा आणला. मात्र कांद्याला एक हजार 700 रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

 

 

अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतकर्‍यांनी दोन हजार 500 रुपये भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापार्‍यांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर यावेळी उपस्थित होते.

 

 

लिलावात चुकीचे वागणार्‍यांवर कारवाई केली जाईल. व्यापार्‍यांनी सुद्धा शेतकर्‍यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर 3-4 व्यापार्‍यांना नोटिसा काढू. चुकीचे वागणार्‍या शेतकर्‍यांना समज देऊ.  लिलावात चुकीचे वागणार्‍यांवर कारवाई केली जाईल. व्यापार्‍यांनी सुद्धा शेतकर्‍यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर 3-4 व्यापार्‍यांना नोटिसा काढू. चुकीचे वागणार्‍या शेतकर्‍यांना समज देऊ.

– नानासाहेब गव्हाणे, उपसभापती

 

कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतकर्‍यांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी एक हजार 600 ते एक हजार 800 रुपये निघाले होते. लिलावास 10 पैकी 15 व्यापारी उपस्थित होते.  कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतकर्‍यांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी एक हजार 600 ते एक हजार 800 रुपये निघाले होते. लिलावास 10 पैकी 15 व्यापारी उपस्थित होते

 

– परसराम सिनगर, सचिव

 

ज्याचा माल नाही त्याने व्यापार्‍याला शिवीगाळ केली. वास्तविक ज्याचा माल आहे त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील लिलाव होणार नाहीत.  ज्याचा माल नाही त्याने व्यापार्‍याला शिवीगाळ केली. वास्तविक ज्याचा माल आहे त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील लिलाव होणार नाहीत.

– अजित लोहाडे, व्यापारी

LEAVE A REPLY

*