गणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी – महापौर

0
नाशिक । शहरातील गणेश मंडळांना परवांग्या देण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात येणार असुन मंडळाना महापालिकेकडुन संपुर्ण सहकार्य केले जाणार असल्याची माहिती आज महापौर रंजना भानसी यांनी दिली.
नाशिक महापालिकेतर्फे शहरातील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाची बैठक महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी भवनातील रेकॉर्ड हॉल येथे झाली.

बैठकीत मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी काही महत्वपुर्ण सुचना केल्या. यात वीज वितरण कंपनी कडून लवकरअनामत रक्कम परत मिळणे,ती अनामत रक्कम कमी करावी,मिरवणूक मार्गावरील गेल्या 14 वर्षा पासून विजेचे पोल अडथळा आहेत ते काढावेत, करणे,रस्त्यावरील खड्डे बुजविणे,निर्माल्य संकलन व्यवस्था करून निर्माल्य कलश वाढवावे, परवांग्यांसाठी एक खिडकी योजना राबवावी अश्या विविध समस्या सोडविण्याची मागणी केली.

त्यावर नाशिक महानगर पालिकेचा वतीने गणेशोत्सव काळात विविध समस्या व उपाय योजना केला जाणार असुन मिरवणूक मार्गावरील विविध समस्या सोडविल्या जाणशर आहे. गणेश उत्सव काळात निर्माल्य संकलना साठी जादा निर्माल्य कलश वाढविणे, स्वछतेबाबत काळजी घेणे, गोदावरी नदीचे प्रदूषण कमी होण्याची दृष्टीने कृत्रिम तलावांची सख्या वाढविणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आदी कामे केली जाणार अअसल्याचे महापौरांनी सांगिलते.

त्यावेळी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे बाबत मंडळांनी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले.मंडळाच्या वतीने लक्ष्मण धोत्रे, हेमंत जगताप, महेश बर्वे, सत्यम खंडाळे आदीसह मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन व आभार गोपीनाथ हिवाळे यांनी मानले.

या बैठकिस सभागृह नेते दिनकर पाटील,अतिरिक्त आयुक्त रमेश पवार,गटनेते संभाजी मोरुस्कर,प्रभाग सभापती डॉ हेमलता पाटील, प्रियंका माने, शाहीन मिर्झा, शहर सुधार समिती सभापती भगवान दोंदे, नगरसेवक मच्छिद्र सानप, रवींद्र धिवरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, नगरसेविका पूनम सोनवणे, प्रियंका घाटे, प्रतिभा पवार,भाग्यश्री ढोमसे, सलीम शेख, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता यु बी पवार, अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले,शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बांबळे,वीज मंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन घुमरे तसेच विविध विभागांचे प्रमुख बैठकीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*