Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक काळात बल्क संदेश पाठविणाऱ्यास बेड्या; मतदानाच्या आदल्या दिवशी उडवला होता ‘राजकीय गोंधळ’

Share

नाशिक | प्रतिनिधी

लोकसभा मतदार संघातील प्रचारतोफा थंडावल्यानंतर विरोधी पक्षास मतदान करण्याबाबत बल्क संदेश पाठवण्यात आले होते. या संदेशांमुळे राजकीय क्षेत्रात गोंधळ उडाला होता. याप्रकरणी एका संशयितास नाशिकच्या सायबर पोलिसांनी पालघर जिल्ह्यातून एकास ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर व महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, आमदार सीमा हिरे,  सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे, आमदार बाळासाहेब सानप,  देवयानी फरांदे यांच्या नावाने दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा असे संदेश पसरवण्यात आले होते.

यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच सर्व नेत्यांनी पोलीस ठाणे गाठून हा खोडसाळ पणा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईच्या पालघर भागातून एका संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सलीम खान (वय ३१)  असे या संशयिताचे नाव आहे.

सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बल्क संदेशांचा मागोवा घेत खान यास पालघर जिल्ह्यातून जेरबंद करण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, तांत्रिक बाबीत त्याने एसएमएस पुढे पाठवले परंतु ते नेमके कोणी बनवले, त्यास कोणी सांगितले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. नाशिकचे सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!