#HundredYearsofRupee1 : रुपयाची शंभरी!

नोटेचा आज शतकमोहत्सव!

0

प्रत्येकाच्या आयुष्यात एक रुपयाचा वापर होतो. लग्न-कार्यातही या एक रुपयाला खूप महत्व आहे. हीच एक रुपयांची नोट आज 100 वर्षांची झालीये.

या नोटेची सुरुवात आणि 100 वर्षांचा इतिहासही काही खास आहे. चला तर मग पाहूयात 1 रुपयाच्या नोटेबद्दल काही खास…

पूर्वीच्या काळी आणे हा प्रकार होता. एका रुपयात 16 आणे होते. नंतर एका रुपयात 100 नव्या पैशांची मोजणी सुरु झाली.

पहिले विश्वयुद्ध आणि देशाची सत्ता इंग्रजांच्या हातात होती. त्या काळात 1 रुपयांचा चांदीचा शिक्का चलनात होता. मात्र, युद्धकाळात 1 रुपयांचा शिक्का बनवण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर 1917 मध्ये पहिल्यांदा 1 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.

100 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 नोव्हेंबर 1917 रोजी सरकारने एक रुपयाची पहिली नोट चलनात आणली. त्यावेळी ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो नोटवर छापण्यात आला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या नोटेची छपाई पहिल्यांदा 1926 मध्ये बंद करण्यात आली. त्यामागचे कारण म्हणजे छपाईसाठी होणारा खर्च. त्यानंतर 1990 रोजी पुन्हा छपाई सुरु केली आणि 1994 पर्यंत सुरु राहीली. त्यानंतर या नोटची छपाई पुन्हा 2015 रोजी सुरु केली.

एक रुपयांच्या नोटेची खास बाब म्हणजे इतर नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक प्रसिद्ध करत नाही तर स्वत: भारत सरकार या नोटांची छपाई करते. या नोटवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी नसते तर देशाचे वित्त सचिवांची सही असते. इतकचं नाही तर ही एक ‘मुद्रा’ नोट (करंसी नोट) आहे तर इतर नोटा या (प्रॉमिसरी नोट) असतात.

रुपया शब्दाचे मुळ संस्कृतमधील रुप् किंवा रुप्याह् येथून आहे. याचा अर्थ कच्ची चांदी असा होतो आणि रुप्यकम्चा अर्थ चांदीचा शिक्का असा होतो. ‘रुपया’ शब्दाचा प्रयोग सर्वातआधी शेरशाह सुरी यांनी आपल्या शासन (1540-1545) दरम्यान केला होता.

LEAVE A REPLY

*