‘वन प्लस’ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन बाजारात!

0

भारतीय बाजारपेठेत वन प्लस 5 हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

आता हा स्मार्टफोन स्टार वॉर्स लिमिटेड एडिशनच्या माध्यमातून नवीन स्वरूपात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

नावातच नमूद असल्यानुसार स्टार वॉर्स या लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या थीमचा यात उपयोग करण्यात आला आहे.

बंगळुरू शहरात सुरू असणार्‍या कॉमिक कॉन-2017 या कार्यक्रमात संबंधीत स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली. याचे मूल्य तसेच अन्य ऑफर्सला जाहीर करण्यात आलेले नाही.

तथापि, याच्या प्रतिमेचा टीझर जारी करण्यात आला आहे. 15 डिसेंबर रोजी स्टार वॉर्स : द लास्ट जेडी हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, वन प्लस 5T या मॉडेलची यावर आधारित आवृत्ती लाँच करण्यात आल्याचे मानले जात आहे.

यात संबंधीत चित्रपटाचे बोधचिन्ह मागील बाजूस दर्शविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

*