Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ व  अतिवृष्टी मुळे अमळनेर तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यु तर चोपडा तालुक्यात दोन जनावरे जखमी तर दोन घरांचे नुकसानीची सह शेतीचे नुकसान देखील झाले असून या नुकसानी बाबत जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी रात्रीच्या सुमारास झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अमळनेर तालुक्यात येथे ते राजेंद्र वामन कोळी या शेतकऱ्याचा वादळी वाऱ्या मुळे अंगावर झाड पडून मृत्यू झाला.  चोपडा तालुक्यात 2 जनावरांचा मृत्यू सह दोन जनावरे जखमी झाली आहेत.
एक घर पडून नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात दोन ठिकाणी दोन कच्ची घरे पडल्याने नुकसान झाले आहे तर केळी पिकाचे देखील अंशता नुकसान झाले आहे. तसेच पाचोरा तालुक्यात देखील दोन गावात चक्रीवादळामुळे एका घराचे नुकसान झाले असून दहा शेतकऱ्यांच्या शेतामधील शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल स्थानिक तहसीलदारांकडून प्राप्त झाला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी म्हटले आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या