बरेली एक्स्प्रेसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

0
नांदगाव (विशेष प्रतिनिधी)| नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ १४३१३ लो.टी टर्मिनसहून बरेलीकडे जाणाऱ्या बरेली एक्सप्रेसमधून शशिकांत पद्माकर जोशी वय (४८) या प्रवाशाचा पडून मृत्यू झाला.

मयत प्रवाशी मलकापूर येथील असल्याचे समजते. धावत्या रेल्वेतुन पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. शशिकांत जोशी यांना तुषार पांडे व राम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहोचवले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जि आर पी जगदाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*