एक देश, एक रेशन कार्ड योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी

एक देश, एक रेशन कार्ड योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी

स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जून २०२० पासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

ते मंगळवारी संसद भवनात बोलत होते. ते म्हणाले, या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.

बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे,  असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com