लासलगावातून 1 मे. टन आंबा अमेरिकेला

0

लासलगाव । हारुण शेख

दरवर्षीप्रमाणे यंदा ही आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे सुरु झालेली आहे. आपल्या वैशिष्टयपुर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजविणार्‍या आंब्याची यू.एस वारी सुरु झाली आहे.

पहिली आंब्याची कंसायमेंट लासलगाव येथून प्रक्रिया होवून अमेरिके साठी रवाना करण्यात आली आहे. या पहिल्या कंसायमेंट मधून 1 मेट्रिक टन आंबे हे एग्रो सर्ज इरिडेशन प्रायव्हेट लिमिटेड कडून प्रक्रिया होवून यू.एस साठी रवाना करण्यात आली.

भारतीय आंबे हे चविष्ट असल्याने विदेशातून मोठी मागणी मिळत आहे. गुरुवार दि.11 रोजी एकुण 330 आंब्याच्या बॉक्सवर प्रक्रिया होवून एक मेट्रिक टन आंबा हा यू.एस साठी पाठविण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख प्रणव पारेख यांनी दिली.

विकिरण प्रक्रियेमध्ये उष्णतेचा वापर न करता पदार्थ टिकविले जात असल्यामुळे त्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहतो. गॅमा किरण कुठल्याही पदार्थात खोलवर जावू शकत असल्यामुळे बाजारात ठेवण्यात येणार्‍या सीलबंद पदार्थांवरही प्रक्रिया करता येते.

शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादित शेतमालाची रेडिएशन करुन साठवणूक केली तर त्याची टिकवण क्षमता वाढल्याने मालाला चांगला भाव मिळतो. लासलगाव येथे 31 ऑक्टोंबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.

मात्र येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करुन तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणार्‍या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. 10 एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगाव येथे आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या हंगामात आंब्याची वारी सुरु झाली आहे.

2007 पासून झालेली  आंबा निर्यात 

सन       निर्यात (टन)

2007    157
2008    275
2009    121
2010    96
2011    85
2012    210
2013    281
2014    275
2015    328
2016    560
2017    545
2018    591

LEAVE A REPLY

*