Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पिंपळगाव बसवंत : सर्पदंशाने एकाचा मृत्यू

Share

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर

पिंपळगाव बसवंत जवळील नारायण टेंभी येथील सचिन भिका गवळी (वय 36) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की,  सचिन गवळी हे आपल्या राहत्या घरात झोपलेले होते. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या हाताला विषारी जातीच्या सापाने दोन वेळा दंश केला. त्यांना याबाबत लक्षात आल्यानंतर आरडा ओरड करून त्यांना तात्काळ पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अतिशय गरीब परिस्थितीत आई, वडील पत्नी व मुलाची जबाबदारी सचिन यांच्यावर होत. सचिन अतिशय मनमिळावू स्वभावाचा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज सकाळी सचिन गवळी यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!