Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिटको कॉलेजसमोर झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर

बिटको कॉलेजसमोर झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर

नाशिकरोड | प्रतिनिधी 

बिटको कॉलेजसमोर झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. गंभीर जखमी असलेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

बिटको कॉलेज समोर ही दुर्घटना घडली. मनोज लोखंडे  व त्यांच्या पत्नी दुचाकी क्रमांक  एम एच 15 इसी 8418 ने प्रवास करत होते. याच वेळी एमएच15 जी एल 76 77 दुचाकीला धडक दिली.

या घटनेत पतीला गंभीर दुखापत झाल्याने मनोज लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेल्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली. यानंतर नागरिकांनी पत्नीला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेत पतीचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघातास कारणीभूत असलेला ट्रक फरार झाला असून पोलीस यंत्रणा या ट्रकचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या