Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ठाणगाव : ट्रॅक्टर उलटून एक ठार, चार जखमी

Share
ठाणगांव : वार्ताहर
सिन्नर मार्गावरील देवीच्या खिंडीत घाटरस्त्याच्या वळणावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य 4 जण जखमी झाल्याची घटना आज (दि.17) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. किरण नामदेव बिन्नर (वय,19) रा. हिवरे असे या अपघातातील मयत तरूणाचे नाव आहे.
हिवरे येथील किरण बिन्नर, दिपक मेंगाळ, पियुष बिन्नर, तेजस सहाणे, विकास सहाणे हे तरुण आज (दि.17) दुपारी ट्रॅक्टर घेऊन बोरखिंड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत रोपे घेण्यासाठी निघाले होते.
ठाणगाव- सिन्नर रस्त्याने देवीच्या खिंडीजवळ आल्यानंतर एका वळणावर चालकाचताबा सुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. यात  ट्रॅक्टरखाली दाबल्याने किरण बिन्नर या तरूणाचा मृत्यु झाला. तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी सिन्नर येथीस खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!