नाशिक : पेट्रोलने भरलेल्या बाटलीचा भडका; एकाचा मृत्यू

0

इंदिरानगर | वार्ताहर

विना झाकणाच्या पेट्रोलच्या बाटलीचा भडका उडाल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटी ही (दि. ९) तारखेला ही घडली होती. या घटनेतील जखमी नितीन नाशिककर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. ५५ टक्के भाजल्याने आज त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

नितीन गोविंद नाशिककर (वय ५२) असे मृत वृद्धाचे नाव आहे. प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिककर हे त्यांच्या राहत्या घरात विना झाकणाची पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन येत होते.

अचानक या बाटलीचा भडका उडाला. या घटनेत ते ५५ टक्के भाजले होते. तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारास प्रतिसाद न दिल्याने डॉ. भुसारे यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिककर यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*