Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दुचाकी झाडावर आदळून एक ठार; दोघे गंभीर

Share

नाशिक | प्रतिनिधी

भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळल्याने एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री त्र्यंबक रोडवरील पोलीस प्रबोधिनी समोर घडली.

येथील न्यायाधीशांच्या बंगल्यासमोरून ट्रिपल सीट घेऊन दुचाकी क्रमांक (एमएच १५, एफवाय ६४७४) ने सातपूरच्या दिशेने जात होते. दुचाकी भरधाव होती, याच वेळी एक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते.

जखमींना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान तुषार भाऊसाहेब शिंदे अशोक नगर सातपूर या युवकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

तर या घटनेत गोलू उर्फ सौरभ उपेंद्र सिंग व दत्तात्रेय कृष्णा गायकवाड  (रा. विन्चुरे ता बागलाण)  हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झाडावर दुचाकी आदळून एका मोटारीला अपघात झाला होता. यामध्ये चालक जागीच ठार झाल्यानंतर रस्त्यावरील झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पुन्हा एकदा असाच अपघात झाल्यामुळे पुन्हा हा प्रश्न तापण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!