Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : पुणे-इंदौर महामार्गावर अपघातसत्र सुरूच; दुचाकी स्लीप होऊन गेला निरपराध बळी

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident
मनमाड | वार्ताहर 
मनमाड शहरांतून जाणाऱ्या पुणे-इंदौर या महामार्गावरील खड्डयांनी आज एका निरपराधाचा बळी घेतला असून खड्डे वाचविताना मोटारसायकल स्लिप होऊन मागून येणाऱ्या ट्रकखाली तीन जण सापडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
हा अपघात मनमाडच्या रेल्वे ओव्हरब्रिजवर घडला असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, ज्ञानेश्वर भिका भामरे (वय ४९), शितल भामरे (वय १६) राहणार रोहजाने तालुका मालेगांव भगवान पाटील (वय५४) मालनगावं तालुका मालेगांव हे तिघे मोटारसायकलवरून येवल्याकडे जात असताना मनमाडच्या रेल्वे ओव्हरब्रिजवर ट्रकखाली सापडले या अपघातात भगवान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर व शितल हे गंभीर जखमी झाले आहे.
खड्डा चुकवीत असतांना मोटारसायकल स्लिप झाल्यामुळे हा अपघात झाला असुन खड्डयांमुळे एका निरपराधाला जीव गमवावा लागला तर दोन जण मृत्युशी झुंज देत आहे.
पुणे इंदूर हा महामार्ग मनमाड शहरांतून जातो गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे झाले असुन या महामार्गाची अक्षरशःचाळणं झाली आहे.या खड्डयांमुळे वाहन चालवितान चालकांना तारेववरची कसरत करावी लागत आहे.
खड्डयांमुळे रोज अपघात होत असल्याने एकाप्रकारे हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.विशेष म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली करून एका प्रकारे त्यांची लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनि केला असुन महामार्गाची चाळण होऊन अपघातांची मालिका सुरू झालेली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक का करत आहे असा प्रश्न नागरिकांसोबत वाहनधारक व चालकांनी उपस्थित केला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!