Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात; एक ठार, चालक गंभीर

Share

गोळशी | वार्ताहर 

दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे काल रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जन जागीच ठार झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, गोळशी फाट्याकडून गोळशीकडे जात असताना गावानजीक चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारीत शिरली. या  अपघातात नामदेव हिरामण गायकवाड (वय 30) हा डोक्याला जबर मार लागल्याने ठार झाला तर चालक दगू काशिनाथ गायकवाड व वाळू निवृत्ती चोथवे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच गावाचे पोलीस पाटील यांचे पती बाळू जाधव यांनी आपल्या वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे येथे जखमींना उपचारार्थ दाखल केले. दरम्यान,  अपघाताच्या गुन्हयाची नोंद करून अधिक तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!