कांदा व्यापाऱ्याकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

0
नगर : नोटबंदी करून चार महिन्यांहून अधिक दिवस लोटले गेले तरीही आज अहमदनगरमध्ये तब्बल एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संजय शेलार नामक कांदा व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शेलार हा संत नामदेव नगरमध्ये राहतो. त्याच्या घरात जुन्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. नोटाबंदीनंतर शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुन्या नोटा जप्त करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. यावेळी शेलारच्या घरातील एका बॅगेत पाचशे आणि हजाराच्या 99 लाख 98 हजार 500 रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या.

LEAVE A REPLY

*