Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : ६० लाखांच्या फसवणुकी प्रकरणी एकास अटक

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट घेऊन देतो असे कारण सांगुन ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपीस सापळा रचून अहमदनगर येथून अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,  राजेंद्र भास्करराव बोरसे , वय ५२ , व्यवसाय – व्यापार , रा . दि . २१ / १ , गणेश पाई, राधा सोना नगर, खुटवडनगर, नाशिक यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीत त्यांच्या कंपनीची जागा अपूर्ण पडत असल्याने अंबड मधेच बोरसे व त्यांचा मित्र मिळून प्लॉट शोधत होते.

दरम्यान, त्यांची ओळख रमेश राजाराम कुलकर्णी रा. भुतडा निवास, पद्मश्री नगर, सादतपुर रोड, बालाजी मंदिरामागे , लोणी प्रवारा , ता . राहाता , जि . अहमदनगर त्यांच्याशी झाली.

कुलकर्णी यांनी अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये २ हजार चौरस मीटरचा प्लाट नंबर एस २६ दाखविला व सदर जागेचा व्यवहार १ कोटी रुपयांस ठरला.

दरम्यान,  कुलकणी यांनी सांगितले की, सदरचा प्लाट हा एमआयडीसीच्या नावाने असुन तो मी मंत्रालयामधुन ई-टेंडरीगची प्रक्रिया करून तुम्हाला देतो. सदर प्लाट संदर्भात सरकारी परवानग्या मी स्वत: आणुन देईल असे सांगून आरटीजीस द्वारे १७ लाख व ४३ लाख रुपये रोख असे ६० लाख रुपये घेऊन अद्यापपर्यंत कुठलाच व्यवहार न केल्याने व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, कुलकर्णी हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्याकरिता अंबड पोलीसांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते . त्यांनी सदर इसमाची गोपनीय माहिती काढून जळगांव या ठिकाणी सापळा रचला असता तो अहमदनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक अहमदनगर येथे गेले.

तेथे जावुन अहमदनगर येथील एमआयडीसी परिसरात शोध घेवुन पहाटे त्यास ताब्यात घेवुन अंबड पोलीसांनी अटक केली. सदर कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २, अमोल तांबे , सहायक पोलीस आयुक्त विभाग – ३ ईश्वर वसावे यांचे मार्गदर्शनानुसार अंबड पोलीस ठाणेचे वपोनी श्रीपाद परोपकारी यांचे मदतीने उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस नाईक अविनाश देवरे, पोलीस शिपाई प्रशांत नागरे यांनी केली.

अशा प्रकारे नाशिक शहरामधील ज्या नागरीकांची फसवणूक झालेली असेल त्यांनी अंबड पोलीसांशी संपर्क साधावा व कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी त्याक्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा जेणे करून कुणाची आर्थिक फसगत होणार नाही .

श्रीपाद परोपकारी, वपोनी अंबड पोलीस ठाणे. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!