Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

मोबाईल दुकान फोडणारा चोरटा ३६ तासांत गजाआड; चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या दोघांनाही बेड्या

Share
सिन्नर । वार्ताहर  
सिन्नर बसस्थानकाशेजारी असलेल्या नगरपालिका व्यापारी संकुलातील मोबाईल दुकान फोडून 25  हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल संच लांबवणाऱ्या चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अवघ्या 36 तासांत गजाआड केले.
त्याच्याकडून चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्या दोघांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आज दि27 सिन्नर न्यायालयाने या सर्वांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चिंचोली येथील श्रीराम आमले यांच्या आर्या मोबाईल शॉपीचे शटर वाकवून बुधवारी दि. 24  मध्यरात्री दुकानातील 25 हजार किंमतीचे 2 मोबाईल संच व सुमारे दोन हजार रुपयांची इतर अक्सेसरी लांबवण्यात आली होती. दुकानात सुमारे दिड लाख रुपये मूल्याचे विविध प्रकारचे मोबाईल संच असताना चोरटयांनी केवळ दोनच संच लांबवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतल्यावर सिन्नर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. चोरीच्या या प्रकारात स्थानिक व्यक्तीचा सहभाग असावा अशी शक्यता लक्षात घेऊन तपासाची दिशा निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  मध्यरात्री एक ते पहाटे चार वाजेदरम्यान गावठा परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
शुक्रवारी दि.26 मध्यरात्री वाजे विद्यालयाकडून बसस्थाकाकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलीस गस्ती पथकाला सुदर्शन उर्फ बंटी पांडुरंग पाचोरे (20) रा. भोई गल्ली हा संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. गस्ती पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवा. किरण गोसावी, विनोद टिळे, किरण पवार यांनी त्यास हटकले असता तो पळू लागला.
त्यामुळे पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. रात्री या भागात कशासाठी फिरतो आहे याबाबत विचारले असता तो वेगवेगळी उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला. नंतर मात्र त्याने आपण चोरी करण्यासाठी या परिसरात आल्याचे सांगत आर्या मोबाईल शॉपी हे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
दुकानातून चोरी केलेले मोबाईल आपण सोपान राजेंद्र पाचोरे (19) रा. पाचोरे मळा व पवन रतन लोंढे (21) रा. गावठा यांना विकत दिल्याचे बंटी याने पोलिसांना सांगितले.
दिवसभर पोलीस या दोघांच्या शोधात होते. अखेर रात्री त्यांना देखील चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. बंटी याला शुक्रवारी सायंकाळी तर इतर दोघांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आज दि. 27 या तिघांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!