Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगाव गोळीबारातील मुख्य संशयित गजाआड

मालेगाव गोळीबारातील मुख्य संशयित गजाआड

मालेगाव । प्रतिनिधी

शिवाजी पुतळा परिसरातील महेशनगरात राहणारे माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान अमानुल्ला खान यांच्या घरावर अंदाधूंद गोळीबार केल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.  गोळीबाराच्या घटनेने हादरलेल्या मालेगावातील घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली होती.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे संशयित मालेगाव शहरातीलच असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी नागझाप झोपडपट्टी परिसरातुन सराईत गुन्हेगार असलेल्या शेख इम्रान शेख खालिद उर्फ इमान बाचक्या, वय २७ रा. अख्तराबाद देवीचा मळा, मालेगाव, मुळ रा. अजमेरानगर, धुळे, जि.धुळे यास सापळा रचुन ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल मॅगझिनसह जप्त केले आहे. या संशयिताने त्याच्या साथीदारासह मिळुन काल (दि. २७)  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव शहरातील महेशनगर परिसरात राहणारे रिजवान खान यांचे घरावर त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्टलमधुन फायर केल्याची कबुली दिली आहे.

अशी घडली घटना…

शहराच्या मध्यवस्तीत शिवाजी पुतळा परिसरातील महेशनगरात माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. रात्री ते कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना रात्री 2 वाजता दारावरील बेल खणाणल्याने प्रा. खान उठून बसले. त्यांनी लाईट लावले. काही वेळाने पुन्हा बेल वाजल्याने ते दार उघडण्यास गेले असता पत्नी समीना कौसर यांनी दार न उघडता खिडकीतून डोकावून पाहण्यास सांगितले.

प्रा. खान यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता तोंडावर रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अचानक खिडकीवर गोळ्या झाडल्या. प्रा. खान यांनी प्रसंगावधान राखत घरातील लाईट बंद केले. यावेळी हल्लेखोरांनी ‘रिजवान बाहर आ’ असे सांगत धमकावले.

यानंतर घराच्या संपुर्ण बाजूने फेरफटका मारत हल्लेखोरांनी खिडक्यांवर गोळीबाराच्या सात ते नऊ फेरी झाडल्या. यावेळी प्रा. खान यांनी शेजारी राहणारे नगरसेवक मुस्तकिम डिग्नेटी व माध्यम प्रतिनिधी जहूर खान यांनी भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली.

जहूर खान यांनी त्वरीत शेजारच्या अग्नीशमन दल कार्यालयासह शहर पोलिसांना कळविताच अग्नीशमन कार्यालयाने सायरन वाजविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे हल्लेखोरांनी पलायन केले.  यानंतर पोलीस यंत्रणा घात्नासाठली दाखल होत तपासाची चक्रे फिरविण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या