आंतराष्ट्रीय ड्रॉपबॉल स्पर्धेत ओमकारला सुवर्ण

0
नाशिक । कोलंबो (श्रीलंका) येथे पार पडलेल्या आंतराष्ट्रीय ड्रॉप बॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिकच्या ओमकार पाठकने सुवर्णपदक पटकावले आहे.

या स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर 4-1 ने पराभूत केले. यापूर्वी ड्रॉप रोबॉलची शालेय राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे पार पडली.

या खेळाबरोबरच ओमकारने सीबीएससी परिक्षेत 87 टक्के गुण मिळवले आहे. ड्रॉप राबॉल खेळाचे जनक ईश्वर सिंग पनगल, महासचिव लता शर्मा, महाराष्ट्र ड्रॉप रोबॉलचे अध्यक्ष शैलेंद्र सोनजे, कार्याध्यक्ष राजेंद्र बानमारे, दिनेश अहिरे, कोषाध्यक्ष विलास निरभवणे, प्रशिक्षक बाळासाहेब रणशूर, विलास गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय संघाला आंतराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. एस. पी. मैसी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*