Friday, May 3, 2024
Homeनाशिकऑलिम्पिक सप्ताहाचे बक्षिस वितरण शनिवारी

ऑलिम्पिक सप्ताहाचे बक्षिस वितरण शनिवारी

नाशिक । Nashik

जागतिक ओलीम्पिक सप्ताह निमित्त कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने, क्रीडा साधना संस्था, डी. एस. फौंडेशन आणि नाशिकच्या विविध क्रीडा संस्था संघटनांच्या वतीने जूनमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे बक्षिस वितरण शनिवारी (दि.28) होणार आहे.

- Advertisement -

23 जून ते 30 जून हा सप्ताह संपूर्ण जगभरात जागतिक ऑलीम्पिक दिवस आणि ओलीम्पिक सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षी कोविड – 19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे यावेळी शासनाचे नियम पाळून आणि महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ऑलीम्पिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहात 23 जूनला ऑलीम्पिक ज्योत प्रज्वलन, 24 जून रोजी वृक्षारोपण , 26 ते 28 जून दरम्यान ऑलीम्पिक आणि खेळा संदर्भात चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा तर 29 आणि 30 जून रोजी ऑन लाईन प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध उपक्रमांना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

परंतु लॉक डाऊन असल्यामुळे या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजन करता आला नाही. परंतु आता परिस्थिती काहीशी निवळली असल्यामुळे या सर्व उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन शनिवार (दि.28) रोजी दुपारी 4 वाजता श्री कालिका मंदिर देवी ट्रस्ट सभागृह येथे करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यातम आलेे. यावेळी कोविड – 19 च्या संदर्भात शासनाच्या सर्व अटींची पूर्तता करून कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे पदाधीकारी अ‍ॅड. धनंजय भोसले, प्रकाश तुळपुळे, डॉ. चंद्रजीत जाधव डॉ. उदय डोंगरे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी या विविध उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र आणि प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंना पारितोषिके दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या