‘सिंहासन’ ने जागवल्या टुरिंग टॉकीजच्या जुन्या आठवणी

जळगाव  – 

डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा प्रसिद्ध चित्रपट ‘सिंहासन ’शनिवारी मोठ्या पडद्यावर पहिला.

‘सिंहासन’मधील राजकीय व्यक्तींच्या एकमेकांवरील कुरघोडी आणि राजकीय डावपेच, त्याभोवती फिरणारे समाजकारण, पत्रकारिता आदी आजच्याही राजकीय परिस्थितीवर  भाष्य करीत आहे, अशा प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केल्या.

लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगतानिमित्त चार दिवसीय फकिरा टुरिंग टॉकीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेला प्रारंभी 1921 मध्ये 7007 रुपये देणगी देणारे फकिरा हरी पाटील यांच्या नावाने हा महोत्सव घेतला जात आहे. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके यांच्या उपस्थितीत झाला. प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी या महोत्सव घेण्यामागील भूमिका स्पष्ट करीत ‘सिंहासन’ सिनेमाविषयी सांगितले. या वेळी माजी सनदी अधिकारी मंगला ठोंबरे व नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाला विद्यार्थिनी, शिक्षक, नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘उष:काल होता होता, काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या गीताने पुन्हा एकदा उत्साह जागविला.

या वेळी संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, उपप्राचार्या  डॉ.रत्नप्रभा महाजन, प्रा. सुनीता बी.पाटील,  मुख्याध्यापिका चारुलता

पाटील आदी उपस्थित होते.

आज ‘उंबरठा’ चित्रपट

या महोत्सवात रविवार, 22 रोजी जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ हा स्मिता पाटील व गिरीश कर्नाड अभिनित चित्रपट दाखविण्यात येणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *