#OkhiCyclone : रायगड जिल्ह्यातील 242 बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परतल्या!

0

रायगड जिल्ह्यातील समुद्रात असलेल्या एकूण 250 बोटीपैकी सोमवारी सकाळपर्यंत 242 बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परत आल्या आहेत.

रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे.

प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स अक्टिव्हिटी बंद करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. सागर किनारी  सागरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सध्या तरी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

*