अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळाचा धोका; 4 व 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये

0
मुंबई : अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असूनते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवरील समुद्र खवळलेला असेल.

त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये,लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नयेअसा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर 4 तारखेला अंशत: तसेच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई,कोकणात सागरी भागात वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल.

त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल. 

LEAVE A REPLY

*