Friday, April 26, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : ६४३ जणांचा तालुक्यात अधिकृत प्रवेश

चाळीसगाव : ६४३ जणांचा तालुक्यात अधिकृत प्रवेश

परराज्यातील 64 लोक तालुक्याबाहेर रवाना : बाहेरून आलेले सर्व जण 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन

चाळीसगाव –

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात परराज्य, जिल्हा व तालुकाबाहेर अडकलेल्या नागरिकांना आपल्या तालुक्यात येण्याची परवागी शासनातर्फे देण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यात देखील परराज्यात व जिल्ह्यात आडकलेले 643 जण 1 ते 3 में च्या कालावधीत तालुक्यात आले आहेत. प्रवेश करणार्‍याकडेे शासनाचे वैद्यकिय प्रमाणपत्र व पास असल्याची खातजमा केल्यानतंर त्यांना तालुक्यात प्रवेश देण्यात आला आहे. या सर्वांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच लॉकाडाऊनच्या परराज्यात जाणार्‍या 68 लोकांना शहरात क्वारांटाईन करण्यात आले होते, त्यापैकी 64 लोकांना पास व वैद्यकिय प्रमाणपत्र देवून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात तालुक्यतील इतरत्र आडकलेले 643 जणांनी 1 ते 3 में दरम्यान तालुक्यात आधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे त्या त्या ठिकाणाच्या जिल्हाधिकार्‍यांचा पास व वैद्किय प्रमाणपत्र आहेत. यात परराज्यातून 401 लोकानी तालुक्यात प्रवेश केला आहे. यात गुजरात 230, मध्यप्रदेश 67, राजस्थान 104 लोकांचा समावेश आहे, तर इतर जिल्ह्यातून 247 लोकांनी चाळीसगावात प्रवेश केला आहे. यात धुळे 7, नंदुरबार 47, औरंगाबाद 24, नासिक 97, मुंबई 21 लोकांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बाहेरहुन आलेले सर्व जण 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन

लॉकडाऊनमध्ये बाहेरगावी आडकलेल्यानी शासनाचा पास व वैद्यकिय प्रमाणपत्र घेवून जरी तालुक्यात प्रवेश केला, तरी देखील कोरोनाबाबत खबरदारी म्हणून त्यांना पुढील 14 दिवसांसाठी प्रशासनातर्फे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यात प्रवेश केलेल्या 643 लोकांना पुढील 14 दिवसांसाठी घराच्या बाहेर पडता येणार नाही, अशाची माहिती शासनाकडे असल्यामुळे त्यांच्यावर कडीनजर ठेवण्यात येत आहेत, आशापैकी कोन्ही घराच्या बाहेर पडले तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

परराज्यातील 64 लोक तालुकाबाहेर रवाना

लॉकाडाऊनच्या काळात आपल्या राज्यात जाण्यासाठी बर्‍याच जणांनी शासनाच्या नियमाचे उल्लघन करुन, अनाधिकृतरित्या प्रवास केला होता. तालुक्यातून आशाच पध्दतीने प्रवास करणार्‍या 68 लोकांना गेल्या काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. त्यापैकी 13 लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के देखील मारलेले होते. तब्बल 68 लोकांना शहरातील चाळीसगाव महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात केल्या 14 दिवसांपासून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. शासनाने आपल्या राज्यात जाण्याची सुट दिल्यानतंर चाळीसगाव येथे पकडण्यात आलेल्या 68 पैकी 64 लोकांना पास व वैद्किय प्रमाणपत्र देवून त्यांच्या राज्यात जाण्याची परवागी देण्यात आली. यात राज्यस्थान, बिहार, हारियाणा, उत्तर प्रदेश येथील लोकांचा समावेश आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते त्यांना पास देवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे आदि उपस्थित होते.

पासबद्दल माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी

लॉकडाऊनमध्ये बाहेरगावी आडकलेल्यांना आपल्या घरी तालुक्यात आनण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पास बद्दल माहिती घेण्यासाठी सोमवारी एकच गर्दी झाली होती. येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर सूचना फलकावर पास मिळण्यासंबंधीत माहिती लावलेली आहे. ती वाचण्यासाठी सोमवारी अनेकांची गर्दी दिसून आली, काही जण मोबाईलच्या कॅमेरामध्ये ही माहिती कैद करुन घेतांना दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या