Type to search

Featured सार्वमत

‘त्या’ अधिकार्‍याची बदली स्थगित केल्यास वीज ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा

Share

माळवाडगाव (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर सबस्टेशनच्या एका अधिकार्‍याच्या मनमानी कारभाराबाबत परिसरातील शेतकर्‍यांनी आवाज उठविल्याने त्यांची झालेली बदली स्थगित करण्याचा घाट घातला जात असल्याने सबस्टेशन कार्यक्षेत्रातील शेतकरी, वीज ग्राहकांनी बदली स्थगित करू नये म्हणून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांनी एक महिन्यापूर्वीच वीजबिल प्रश्नावर संबंधित अधिकार्‍याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. भोकर सबस्टेशन कार्यक्षेत्रात भोकर, खोकर, कारेगाव, वडाळा महादेव, टाकळीभान व निपाणी वाडगावचा काही भाग, घुमनदेव, कमालपूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव ही गावे येतात. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ परिस्थिती असल्याने 80 टक्के विहिरी, बोअरमध्ये पाणी नसल्याने शेतीपंप वीजबिल 100 टक्के शेतकरी भरत नाही. ट्रान्सफार्म (रोहित्र) जळाल्यानंतरच शेतकर्‍यांचा कार्यालयाशी संपर्क येतो. यावेळी शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते. घरगुती वीज ग्राहकांच्या त्या अधिकार्‍याच्या कारभाराबाबत तक्रारी आहेत. नियमित वीजबिल भरणार्‍या ग्राहकांचे चुकून एक महिन्याचे बील थकले तरी कनेक्शन कट करण्याची तंबी लाईनमनला देण्यात येते. तीन-चार महिने थकीत ग्राहकांना पाठीशी घातले जाते.

नियमित वीजबिल भरणारे परंतु एखादे बिल भरू शकले नाहीत, अशा शेतकर्‍यांना अगोदर कनेक्शन कट करण्याची नोटीस न पाठवता वायरमनला तोंडी वीज कट करण्याचे आदेश दिले जाते. या प्रकरणावर ग्राहकांनी तक्रारी केल्यावर त्या अधिकार्‍याची बदली झाल्यावर परिसरातील ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. परंतु झालेली बदली पुन्हा स्थगित करण्याचा खटाटोप होत असल्याने परिसरातील बाजार समिती संचालक उपसरपंच विश्वनाथ मुठे, अशोक कारखान्याचे संचालक बबनराव मुठे, संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, माजी सरपंच शिवाजी मुठे, छावा संघटनेचे नितीन पटारे यांच्या नेतृत्त्वाखाली भोकर सबस्टेशन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांनी दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!