सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा : दिल्ली हायकोर्ट

0

दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जातिवाचक शब्दांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना उद्देशून कोणताही जातिवाचक शब्द वापरल्यास तो शिक्षेस पात्र गुन्हा ठरेल.

एका महत्त्वाच्या खटल्यात सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केलं की, सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील कुणाही व्यक्तीबद्दल जातिवाचक शब्द वापरल्यास दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई केली जाईल.

दिल्ली हायकोर्टाने फेसबुकशी संबंधित खटल्यात हे स्पष्ट केले असले, तरी व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सर्वच सोशल मीडियाना हे लागू असेल.

 

LEAVE A REPLY

*