रमजान महिन्यात लोकसभा निवडणुका नको, मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप

0
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकांच्या तारखेवरून एक नवा वाद समोर आला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात मतदानाची तारीख रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रमजानमध्ये येत असलेल्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

6 मे पासून अल्पसंख्याक समुदायाचा रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे.

मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो.

यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नाही असं मते मुफ्ती असद कसमी यांनी मांडले. मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेत घेतला आहे. खालिद रशीद फरंगी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे.

भाजप हटाओ-देश बचाओ’
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम लोक रोजा ठेवतील आणि आपला मतदानाचा अधिकारही बजावतील हे निवडणूक आयोगाने ध्यानात ठेवायला हवे होते. मुस्लिमांनी मतदान करू नये, असे भाजपला वाटत आहे. पण, आम्ही मतदान करणार आहोत. ‘भाजप हटाओ-देश बचाओ’ यासाठी देशातील लोक आता कटिबद्ध आहेत, असेही फिरहाद हाकिम म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*