खून करून चोरलेल्या पैशातून सोडविली गहाण मोटरसायकल

0

नांदगाव (प्रतिनिधी) ता. १ : न्यायडोंगरी येथील शिक्षकाचा खून हा पैशांसाठी झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्या चोरलेल्या पैशातून संशयिताने आपली गहाण टाकलेली मोटरसायकल सोडविल्याची कबुली दिली आहे.

न्यायडोंगरी येथील शिक्षक कैलास गरदल राठोड यांचा कुजलेला मृतदेह २८ जुलैला सापडला होता. प्राथमिक तपासातून हा खूनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले होते.

दरम्यान या प्रकरणी मृत राठोड यांचा मित्र वसंत ऊर्फ काळू सुकलाल राठोड याच्यावर संशय व्यक्त करत त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबूली दिली.

मृत राठोड यांच्याकडे असलेल्या पैशांसाठी त्याने खून केल्याचे स्पष्ट झाले. हे पैसे चोरल्यानंतर त्याने मक्याच्या शेतात लपवून ठेवले. तसेच त्या पैशांनी गहाण टाकलेली त्याची मोटरसायकलही सोडविली.‍

या खून प्रकरणाने न्यायडोंगरी गावासह तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी संशयिताच अटक केली असून त्याच्यावर  नांदगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

*