Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘एनटीएस’ परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

Share

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षेची निवड यादी व शाळानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

यंदा निवड झालेल्या 776 विद्यार्थ्यांपैकी सरकारी शाळांमधील 17, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 11, खासगी अनुदानित 315 तर खासगी विनाअनुदानित शाळांमधील 433 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची उणीव असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्या वतीने 2012-2013 पासून राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर परीक्षा घेण्यात येते. इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते. राज्यस्तरावर 17 नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून 94 हजार 542 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

त्यापैकी एकूण 40 हजार 785 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. महाराष्ट्रासाठी एकूण 776 विद्यार्थ्यांचा कोटा निश्चित करून देण्यात आला आहे. राज्यस्तराच्या परीक्षेत गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेसाठी बसता येणार आहे. ही परीक्षा 10 मे 2020 रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना पीएच.डीपर्यत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी अधिक माहिती ुुु.ाीलर्शिीपश.ळप या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!