Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था  

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरक्षा सल्लागार म्हणून आघाडीची जबाबदारी पार पडणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

डोवाल यांची २०१४ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती केली होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

‘आयबी’चे प्रमुखपद डोवाल यांनी भूषवले आहे. १९८८ मध्ये त्यांना ‘किर्ती चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पुढील पाच वर्षे डोवाल हेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रसुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन सन्मान करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!